निवेदन देणार होता तर अंडी, बांगड्या कशासाठी आणल्या होत्या ? जगदीश मुळीक यांचा राष्ट्रवादीला सवाल

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theater) कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांनी गोंधळ घातला. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी आहे असा आरोप करत आज अलका टॉकीज चौकात भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP city president Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले, स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कट रचून गोंधळ घालण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून वेळोवेळी गुंडागर्दी सुरू आहे. या गुंडागर्दीला सर्व सामान्य जनता वैतागली असून त्याचाच प्रत्त्यय स्मृती इराणीच्या कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला.या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आम्ही निवेदन देऊन आमचे म्हणण मांडणार होतो असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. निवेदन देणार होता तर अंडी,बांगड्या कशासाठी आणल्या होत्या असा सवाल देखील जगदीश मुळीक यांनी यावेळी उपस्थित केला.