ऑफिसला या… नको चहा.. आता गुळ – पाणी प्या….!!

ऑफिसला या... नको चहा.. आता गुळ - पाणी प्या....!!

लातूर दि.27 (जिमाका) : बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले… जंक फूडच्या जमान्यात… शरीरात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक जात असल्यामुळे वाढते पित्तदोष हे आजच्या धावपळीच्या जीवनात वारंवार होणारा विकार होऊन बसला आहे. यात चहाचे वाढते सेवन हे या विकाराला बळ देत आहे. हे लक्षात घेऊन आज पासून जिल्हा माहिती कार्यालयात ‘नको चहा.. आता गुळ पाणी प्या’ असा पाहुणचार होणार आहे.

जिल्हा माहिती कार्यालय हे प्रसार माध्यमातील लोकांचा राबता असलेलं शासकीय कार्यालय….प्रसार माध्यमं हे ओपिनियन लीडर आहेत… आज पर्यंतच्या बदलाचे सर्वात मोठे हक्कदार माध्यम आहेत… त्यामुळे नवीन सुरुवात गुळ पाणी सुरु करत आहोत.

वारंवार शरीरात कॅफीन घालून पित्तदोष ( एका कपात 10 मिली ग्रॅम एवढे कॅफीन असते ) वाढविण्यापेक्षा आता शरीराला पोषक असलेला सेंद्रिय गुळ, तांब्याच्या भांड्यातले वाळे घातलेले पिण्याचे पाणी हा जुन्या काळातला नवा पाहुणचार या कार्यालयात सुरु करत आहोत.

जुन्या काळात पिण्याचे पाणी फक्त तांब्याच्या भांड्यातून पीत असत म्हणून पाणी पिण्याच्या भांड्याचे नावच तांब्या पडले. गुळ पाणी तर आता आता पर्यंत पाहूणचाराची पद्दत आपल्याकडे होती.

त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे गुळ, तांब्याच्या भांड्यातले पाणी आणि वाळा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असलेले पाणी आम्ही सुरु केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

Next Post
प्रत्येक गड-किल्ल्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करा – उद्धव ठाकरे

प्रत्येक गड-किल्ल्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करा – उद्धव ठाकरे

Related Posts
WPL 2024 | दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धमाकेदार एन्ट्री, दुसऱ्यांदा ट्रॉफीसाठी करणार सामना

WPL 2024 | दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धमाकेदार एन्ट्री, दुसऱ्यांदा ट्रॉफीसाठी करणार सामना

WPL 2024 | महिला प्रीमियर लीग 2024 च्या 20 व्या (WPL 2024) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 7…
Read More
MLA Chhagan Bhujbal

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या; छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

मुंबई – अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना…
Read More
आशिष शेलार

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात-  शेलार

मुंबई – वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड (Bandstand at Bandra West) या उच्चभ्रू वस्तीत ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र  किनारी मोक्याच्या…
Read More