जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

मुंबई – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. 2018-19 या वर्षात ही गणना करण्यात आली होती. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.

जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्‍या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले असून, या कार्यात सहभागी सर्वांचे आभार सुद्धा मानले आहेत. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता जलयुक्त शिवार 2.0 अभियान सुद्धा असेच सर्वांनी यशस्वी करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल : संदर्भासाठी लिंक : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1919726 )

Previous Post
नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने

Next Post

पुणे शहरात १००० ठिकाणी “मन की बात” कार्यक्रम आयोजित करणार :- जगदीश मुळीक

Related Posts
अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्याला मराठवाड्यात सर्वाधिक मदत; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

मुंबई : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने एसडीआरएफच्या…
Read More
.... म्हणून काँग्रेस नेत्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली

…. म्हणून काँग्रेस नेत्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली

मुंबई – देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी…
Read More