कोलकाता : संघाचा बीसीसीआयची सर्वसाधारण सभा शनिवारी होणार आहे. या बैठकीच्या आदल्या दिवशी इडन गार्डन्सवर 15-15 ओव्हर्सची प्रदर्शनीय मॅच झाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बीसीसीय अध्यक्षांच्या टीमचा जय शहा (Jay Shah) यांच्या कॅप्टनसीखालील सचिवांच्या टीमने टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या संघाचा फक्त 1 रननं पराभव केला.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष इलेव्हन आणि बीसीसीआय सचिव इलेव्हन असे दोन संघ आमनेसामने आले. यात जय शाह यांच्या संघाने गांगुलीच्या संघाचा एका धावेने पराभव केला. प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरलेल्या गांगुलीने दमदार फलंदाजी करताना ३५ धावांची शानदार खेळी केली. मात्र, या रोमांचक सामन्यात जय शहाच्या संघाला एका धावेने विजय मिळवण्यात यश आले.
प्रथम फलंदाजी करताना जय शहा यांच्या संघाने ३ गडी गमावून १२८ धावा केल्या. विशेष म्हणजे संघासाठी जय शाह यांनी दमदार फलंदाजी करत ४० धावा केल्या. तर अरुण धुमाळ यांनी ३६ धावांची खेळी केली. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव १० धावांवर नाबाद राहिले. सौरव गांगुलीने १९ धावांत एक विकेट घेतली.