‘राहुल गांधींच्या आत जिनांचं भूत शिरल्यासारखं वाटतंय’

नवी दिल्ली – “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?” असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला आणि त्यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सरमा यांनी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, असं म्हणत सरमा यांनी टीका केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधींची भाषा 1947 पूर्वी जीनांची होती तशीच आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राहुल गांधींना आधुनिक जिनाही म्हटले आहे. राहुल गांधींच्या आत जिनांचं भूत शिरल्यासारखं वाटतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यापूर्वी, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या (Uttarkhand Elections 2022) प्रचारादरम्यान, सीएम बिस्वा शर्मा म्हणाले होते की, राहुल गांधींनी देशाचे पहिले संरक्षण प्रमुख दिवंगत बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला होता. ‘तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही, याचा पुरावा मी कधी मागितला आहे का?’ असा सवालही त्यांनी केला होता.