राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad car attack) यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. यामुळे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच रक्त हिरवा आहे अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad car attack) यांनी काही दिवसापूर्वी मांडली होती. याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताफ्यासह ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर बांबूने हल्ला कऱण्यात आला. यावेळी गाडीची काच फोडण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा हल्ला कऱण्यात आला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप