‘गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस’

jitendra awhad and sadavarte

सांगली – एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ'(ST Kashtakari Jansangh)  या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत काल अधिकृत घोषणा केली. दरम्यान, यावेळी गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असे ते म्हणाले.

नथुराम गोडसे यांनी हे सांगितलं होतं की महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी मरताना हे राम म्हटलं नव्हतं ते एवढ्यावरच थांबले नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा (Nathuram Godse) नथुरामजी असा उल्लेख केला आहे.  त्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सदावर्ते यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, गांधीजीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि त्यावेळी नथुरामजी गोडसे म्हणणारा गुणरत्न सदावर्ते हा मूर्ख माणूस आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करवताना सदावर्ते मधील नथुराम गोडसे जागा झाला होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान (Idgah Maidan) परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते. गुणरत्न सदावर्तेच वक्तव्य ऐकलं की घृणा वाटते आणि किळस येते. देशातील पहिला आतंकवादी असणारा नथुराम गोडसे याला सदावर्ते हा गोडसेजी म्हणतोय, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

Previous Post
raj thackeray and bridgebhushan singh

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत; भाजपचा खासदार बरळला

Next Post
nilesh rane

सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे नेते आता…; राणेंची टीका

Related Posts
Nitish Kumar | नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत करणार खेळ, नव्या जोडीदारासोबत सरकार स्थापन करणार

Nitish Kumar | नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत करणार खेळ, नव्या जोडीदारासोबत सरकार स्थापन करणार

Nitish Kumar | लोकसभा निवडणुकीत किंगमेकर म्हणून उदयास आलेले नितीशकुमार पुन्हा एकदा राजकारण खेळण्याच्या मूडमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More
Pune : भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉर्च्युनर

Pune : भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉर्च्युनर

MLA Jaykumar Gore car accident : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gor) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident)…
Read More