राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. यामुळे स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. ताफ्यातील पोलिसांची गाडी पाठीमागं असतानाही जीवाची पर्वा न करता हा हल्ला करण्यात आला.या हल्ल्याची जबाबदारीही स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्वीकारली आहे.
यानंतर आता आमदार आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच संतापले असून त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे संभाजीराजेंना आता राजे म्हणणार नाही किंवा त्यांना अहो जाओ असा मानही देणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच पेटलेला वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे.
स्वराज्य संघटनेच्या कृत्यानंतर संतप्त आव्हाड म्हणाले, मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो. मात्र ,त्यांनी विशाळगडावर जी दंगल घडवली, त्यामुळे आता आपण त्यांना राजे म्हणणार नाही. आपण संभाजीराजेंना अहो जाओ असा मान देऊन बोलणार नाही. यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही, तुला म्हणेन असं जाहीर केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :