Jitendra Awhad | निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जागा दाखवली

Jitendra Awhad | लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. निरेटिव्ह आम्ही सेट नाही करत लोक सेट करत असतात असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमधून अजित पवार गटावर केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरेंनी माझा नाव घेतल नाही. पण मी अजित पवारांच नाव घेतल असा उल्लेख त्यांनी केला. मात्र अजित पवारांच नाव घेऊन माझ्यावर तटकरेंनी हल्ला केला ते त्यांची सवय आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे बघाव त्यांच्या पक्षांमध्ये काय सुरू आहे. असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) म्हणाले.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनिल तटकरे शरद पवार साहेब यांच्या मागे लागले होते. भाजपमध्ये जाण्यासाठी त्यामुळे साहेबांनी त्यांना तारखा दिल्या. साहेबांकडे २००९ ला तुम्ही फॅार्म्युला दिला होता तसेच २०१४ ला सुद्धा तुम्हीच भाजपमध्ये जाण्यासाठी साहेबांच्या मागे लागले होते आणि २०१९ मध्ये देखील तुम्हीच फॅार्म्युला आणला होता भाजपमध्ये जाण्यासाठी असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही विचारधारा सोडली त्यामुळे तुमचे हे हाल होत आहे. आज तुमच्या पक्षाबद्दल आरआरएस म्हणत आहे. तुमचा पक्ष ओझे झालं आहे. मात्र तुम्ही आरआरएसला उत्तर देऊ शकत नाही जर तुमच्यात हिम्मत असेल तर आरआरएसला उत्तर द्या अस आव्हान देखील यावेळी जितेंद्र आव्हाडांनी तटकरेंना दिल आहे.

तुम्ही भुजबळ यांना सांगतात तुम्ही राज्यभर फिरा मात्र छगन भुजबळ यांना राज्यसभा मिळणार नाही. तुमच्या पक्षात काय चालत आहे तुम्ही हे बघा असं म्हणत त्यांनी तटकरेंना टोला लावला. तसेच तुम्ही जाहीर भाषणात खोटं कसं बोलू शकतात? तटकरे तुम्ही इतके आतल्या गाठींचे कसे आहे? असा प्रश्न देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, शरद पवार साहेबांनी कधीच जातीयवादी पक्षासोबत जायचे नव्हते मात्र तुम्हीच सकाळी सकाळी साहेबांकडे जाऊन भाजपमध्ये चला असं म्हणत होते. तुम्ही सत्तेसाठी साहेबांच्या मागे होतात मात्र साहेब तुम्हाला आशेचा किरण दाखवत राहिले त्यामुळे तुम्ही चिकटून साहेबांसोबत राहिले आणि नंतर भाजपसोबत गेले असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निरेटिव्ह आम्ही सेट नाही करत नाही. सोशल मीडियावर आम्ही निरेटिव्ह सेट करत नाही. आज आता लोक स्वतः सोशल मीडियावर आपल्या मत व्यक्त करत असतात. गद्दारीचा निरेटिव्ह काकाचा गळा दाबण्याचा निरेटिव्ह, पाच पाच पद असताना सुद्धा साहेबांना सोडण्याचा निरेटिव्ह हा तुम्ही स्वतः सेट केला. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला माहित आहे की मी किती दृष्ट आहे ते ८४ वर्षाच्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर ढकलू पक्ष ताब्यात घेण्याचा तुमचा कसा दृष्ट हेतू होता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like