Jitendra Awhad | अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा राज्य सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. परंतु ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पत्र लिहित हा दावा फेटाळून लावला आहे. स्वत: इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती उघड केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर भाष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले, इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत, आम्ही ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणणार, असा दावा सरकार करत होते. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखे आहेत, असे म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्याने ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरली होती’, अशी घोषणा सरकारनेच करून टाकली.
अफझलखानाचे पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आम्ही आणणार, असा गाजावाजा या सरकारने केला होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावाही केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितले होते की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही.… pic.twitter.com/E3cuxnR9K0
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 8, 2024
आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनाने पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना कळविले आहे की, ” म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही अन् तसे आम्ही कधी सांगितलेलेही नाही.” म्हणजेच भावनिक राजकारण करता करता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका !, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून,’या’ दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार
Supriya Sule | भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे ;सुप्रिया सुळे यांचा आरोप
Nana Patole | नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ