म्हापशातील विकास पुढे नेण्यासाठी जोशुआ डिसोजा यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्याची गरज – किशन कुमार

म्हापसा : गोव्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून नेत्यांच्या सोबत आता अभिनेते देखील प्रचार करताना दिसून येत आहेत.किशन कुमार तसेच वसई-विरारचे भाजपाचे महामंत्री उत्तम कुमार यांनी म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक १८ या फेअर बाईश परिसरातील प्रचारात भाग घेतला. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या.

यावेळी किशन कुमार बोलताना म्हणाले, गोव्यात सुरू असलेल्या विकासासाठी तसेच म्हापशातील विकास पुढे नेण्यासाठी भाजपचे हात मजबूत करण्यासाठी जोशुआ डिसोजा यांना पुन्हा विधानसभेवर पाठवण्याची गरज आहे असे प्रतिपादन अभिनेता किशन कुमार यांनी केले.

गोव्याची गणना देशातील उत्कृष्ट राज्यांत केली जाते. गोवा राज्य उत्कृष्ट बनवण्यासाठी येथील भाजपा सरकारने साधलेला विकास कारणीभूत ठरला आहे. हा विकास पुढे नेऊन गोव्याला देशातील उच्चतम स्तर गाठून देण्यास भाजपा सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची गरज आहे असे कुमार यांनी सांगितले.