दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला रविश कुमार, पहा मंदिर पाहून काय म्हणाले?

Pune: काही दिवसांपूर्वी पत्रकार रविश कुमार (Ravi Kumar) हे एनडीटीव्हीतून राजीनामा दिल्याने चर्चेत आले होते. उद्योजक अदानी यांनी एनडीटीव्हीमध्ये गुंतवणूक केल्याने त्याने आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता पुन्हा एकदा रविश कुमार चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी पुणे शहराला भेट दिली असून दगडूशेठ गणपतीचे दर्शनही घेतले आहे. पुण्यातील आपल्या प्रवासाचा (Ravish Kumar In Pune) व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सकाळी सकाळी पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असा प्रवास त्यांनी केला असून पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन त्यांनी घेतले. दगडूशेठ गणपतीचे मंदिर पाहिल्यानंतर रविश कुमार यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी होती.

बाहेरून मंदिर पाहताच रविश कुमार म्हणाले, ‘हे तर खूपच सुंदर मंदिर आहे. भव्य आहे.’ मंदिराला पाहून ते स्वत:ला दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यापासून थांबवू शकले नाहीत.