जशी श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते, तशीच आदित्य ठाकरे यांची एकदा नार्को टेस्ट करा : राणे

Nagpur – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले ते AU नावाने होते असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता राजकारण चांगलच तापलं असून, अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत, आता या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का घेतलं जात आहे? इतर राजकीय नेत्यांची नावं का घेतली जात नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा म्हणजे सत्य बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.(Just as Aftab was narco-tested in the Shraddha murder case, Aditya Thackeray should be narco-tested once: Rane).

जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले.