काय सुषमा अक्का, जिकडे राशन तिकडे भाषण हे खरं आहे का ?; जाणून घ्या नेमकी कुणी केलीय हि जहरी टीका

बीड: हिंदू देवी-देवता आणि संतांचा अपमान केल्याने मागे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare )चर्चेत आल्या होत्या. आता त्याच सुषमा अंधारे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी चर्चेत येण्याचे कारण जरा वेगळे आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.

सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यातून त्यांनी अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. दरम्यान, शिवसेने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे सर्व प्रकरण घडल्याचं समोर आलं आहे.दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर, या यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

दरम्यान, अंधारे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेच्या रणरागिणीने प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अक्का, जिकडे राशन तिकडे भाषण हे खरं आहे का असा सवाल करत शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे (Shiv Sena Spokesperson Professor Dr. Jyoti Waghmare) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार वाघमारे यांनी केला आहे.