सिंधीयांनी क्रेडिटसाठी बोलणं सुरु केलं अन् रोमानियाच्या महापौरांनी तिथंच झापलं !

रोमानिया : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने चार मंत्र्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले आहे. यापैकी एक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया रोमानियाला पोहोचले आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी व्हिडिओ ट्विट केला असून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचे श्रेय घेण्यासाठी सिंधिया यांनी भांडण केल्याचा दावा केला आहे. असा दावा केला जात आहे की जो व्यक्ती सिंधियाशी वाद घालत आहे तो रोमानियाचा महापौर आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची आम्ही पुष्टी करीत नाही. हा व्हिडीओ 43 सेकंदाचा असून रोमिनियाचे मेअर ज्योतिरादित्य शिंदेंशी बोलताना दिसत आहे. मेअर शिंदेंना म्हणतात की, हे तुम्ही सांगू नका..यावर शिंदे म्हणतात, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलू..हे तुम्ही ठरवू शकत नाही. यावर रोमानियाचे मेयर संतापतात आणि म्हणतात, तुम्ही फक्त त्यांना इतकच सांगा की, हे कधी जाऊ शकतात. आणि कसं जाणार..तुम्ही यांना भारतात कसं घेऊन जाणार आहात?

आम्ही यांच्यासाठी खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. इतकं म्हणून ती व्यक्ती निघून जाते. दुसरीकडे शिंदे तेथे उभ्या असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्याची योजना सांगतात. सोबतच सरकारकडून केलेल्या व्यवस्थेची माहिती देतात. शिंदे म्हणतात की, येथील सर्व विद्यार्थ्यांना देशात सुरक्षितपणे घेऊन जाऊ. सोबतच रोमानिया सरकारचे धन्यवादही मानतात.