नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त आणि गांधींचे विरोधक व्हाल; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे (Nathuram Godse) नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केले आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कालिचरण महाराज म्हणाले, नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते. महात्मा नथुराम गोडसे नसते तर धर्म बुडाला असता. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

यापूर्वीही कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना 95 दिवस गजाआड देखील राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपलेली नाही, असे दिसत आहे. आता त्यांच्या विधानानंतर हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतो?, हे पाहावे लागेल.