Kanchanjunga Express Accident | बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक

Kanchanjunga Express Accident | बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक

Kanchanjunga Express Accident | पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनवर सोमवारी (17 जून) सकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. याअपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 25-30 जण जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. कांचनजंगा एक्सप्रेसने (Kanchanjunga Express Accident) मालगाडीची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात आत्ताच झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अजून माहितीची प्रतीक्षा आहे. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथक मदतीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, एनएफआर झोनमध्ये एक अतिशय दुःखद दुर्घटना घडली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF च्या टीम एकत्र काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Department of Meteorology | मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

Department of Meteorology | मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

Next Post
T20 WC 2024 Super 8 Schedule | टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 चे चित्र स्पष्ट... पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 WC 2024 Super 8 Schedule | टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 चे चित्र स्पष्ट… पाहा संपूर्ण वेळापत्रक

Related Posts
सायेब… गौतमी पाटील गावात येतेय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज व्हायरल

सायेब… गौतमी पाटील गावात येतेय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज व्हायरल

सातारा- नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. लोक गावजत्रा असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा…
Read More
Manoj Jarange - आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही;ते शब्द मी मागे घेतो

Manoj Jarange – आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही;ते शब्द मी मागे घेतो

ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…
Read More
पोस्ट ऑफीस उघडं आहे

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेत गुरुशिष्याची जोडी मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे!

Mumbai – सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार…
Read More