अतिक्रमण करणाऱ्यास गोळ्या घातल्या जातील..; कंगना रनौतच्या घराबाहेरील पाटी वाचून फुटेल घाम

मुंबई- कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मुंबईत नवीन घर विकत घेतले असून तिच्या घराच्या सजावटीची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने घराच्या बाहेर एक पाटीही लावला आहे. त्यामुळे कंगना विषयी चर्चेचा आणि वादाचा नवीन मुद्दा उपस्थित झालाय.
“कोणतंही अतिक्रमण नाही. अतिक्रमण करणाऱ्यांना गोळ्या घातल्या जातील. आणि यातून बचावलेल्या माणसांना पुन्हा गोळ्या घातल्या जातील,” असं या पाटीत लिहिले आहे. ही पाटी पाहिल्यानंतर घरात कोणीही अनोळखी माणूस प्रवेश करण्यासाठी नक्कीच घाबरेल.
कंगना रनौतचे मुंबईत एक सुंदर अपार्टमेंट आहे. त्याच बरोबर मनालीमध्ये तिचे एक सुंदर घर देखील आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, मिनी माथूर आणि इरफान खान यांच्यासोबत काम केलेल्या इंटिरिअर डिझायनर शबनम गुप्ता यांनी हे घर डिझाइन केले आहे. कंगना रनौतने गुरुवारी आपल्या घराचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती घराच्या सजावटीबद्दल बोलत आहे.
व्हिडिओ शेअर करताना कंगना रनौतने म्हटले आहे की, ‘माझ्या सर्व घरांबद्दल माझी दृष्टी खूप स्पष्ट होती, जेव्हा मी स्वतः करते तेव्हा मला ते अधिक आवडते. त्यात पर्वत आहेत. तंजोरचे चित्र आहे. माझे हृदय पर्वतांमध्ये आहे पण मला दक्षिण भारत देखील आवडतो.’ व्हिडिओमध्ये कंगनाच्या घरातील भिंतीवर तंजोर पेंटिंग दिसत आहे. त्याचबरोबर भगवान बालाजीचे चित्रही दिसते.