तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका; कंगना रनौतचं देशवासियांना आवाहन

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) नुकताच हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर कंगनानं एक व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना व्हिडीओमध्ये म्हणते, ‘माझ्या कुटुंबासोबत मी द कश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिला. विवेक अग्निहोत्री तुम्ही धन्य आहात. या चित्रपटाची निर्मीती केल्यामुळे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. गेली कित्येक वर्ष लोक जे पाप करत होते ते तुम्ही धुतले आहेत. मी तुमचे आभार मानते.’ तसेच पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल, भारतातील लोकांबद्दल देखील कंगनानं वक्तव्य केलं आहे.

‘तुकडे-तुकडे गँग नावाचा कॅन्सर देशाच्या बाहेर फेका’ असंही या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली. ‘या वर्षातील सर्वात महत्वाचा चित्रपट मिस करू नका.’, असं कॅप्शन या व्हिडीओला कंगनानं दिलं.