‘कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या शोमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार हजेरी?

कपिल शर्मा शो (Kapil Sharma Show) हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येकाला पाहुणे म्हणून यायचे असते. मंत्र्यापासून बाबा आणि स्वामींपर्यंत सर्वांनाच कपिलचा स्टेज आवडतो. कपिलची विनोदी उत्तरे पाहुणे आणि प्रेक्षकांची मने जिंकतात. कॉमेडी किंगच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेही नाव जोडले जाणार आहे.

कपिलच्या शोमध्ये पीएम मोदी येणार का?
आज तकच्या ‘सिधी बात’ या कार्यक्रमात आलेल्या कपिल शर्माने सुधीर चौधरींच्या तिखट प्रश्नांना थेट उत्तरे दिली. जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याने पंतप्रधान मोदींना कधी फोन केला होता का? यावर कॉमेडीच्या बेताल बादशाहने दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कपिलच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी शोमध्ये येण्यास नकार दिला नाही.

पंतप्रधानांनी दिले असे उत्तर 
शोमध्ये कपिल शर्माला प्रश्न करण्यात आला की, मोदीजी कधीतरी तुझ्या शोमध्ये यावेत असे तुम्हाला वाटते का? यावर उत्तर देताना टीव्हीचा टॉप स्टँड-अप कॉमेडियन कपिल शर्मा म्हणाला, जेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा मी त्यांना म्हणालो, सर, कधीतरी आमच्या शोमध्ये या. त्यावेळी त्यांनी मला नकारही दिला नाही. ते म्हणाले, आता माझे विरोधक खूप कॉमेडी करत आहेत… कधीतरी येईल.

Zwigato 17 मार्च रोजी रिलीज होणार आहे
यादरम्यान कपिल शर्माने त्याच्या आयुष्यातील संघर्षमय टप्प्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, एक वेळ अशी आली की मी आत्महत्येचा विचार करू लागलो. या जगात आपलं कुणीच नाही असं त्याला वाटत होतं. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कपिलचा झ्विगाटो हा चित्रपट १७ मार्चला रिलीज होणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. Zwigato अतिशय गंभीर विषयावर आधारित आहे.