Karnabala Dunbale | राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर अशी टीका केल्याने संतप्त मनसैनिकांनी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी हल्ला करणाऱ्या ८ मनसे कार्यकर्त्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना जाहीर धमकी देणारे मनसे नेते कर्णबाळा दुनबळे (Karnabala Dunbale) यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर कर्णबाळा यांनी मीडियाशी संवाद साधला.
या भेटीनंतर कर्णबाळा म्हणाले की, “जयमुळे आमचे साहेब खूप दु:खी आहेत. हे सर्व कसं घडलं? यामागे घातपात आहे का? हे जाणून घेतलं. त्यांनी जे निर्देश दिलेत, त्यानुसार काम करणार आहोत. मिटकरी बिटकरी सारख्या फालतू माणसासाठी आमच्या साहेबांकडे वेळ नाही. मिटकरीला काय बरळायचय ते बरळू द्या. त्याच्या तोंडाला मुळव्याध झालाय. त्याच्यावषयी काय चर्चा करायची.” असं राज ठाकरेंनी भेटीत आपल्याला सांगितले असल्याचा खुलासा कर्णबाळा यांनी यावेळी केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप