करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट!

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरील कौटुंबिक अन्यायाची सविस्तर माहिती दिली.

महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार व अन्याय या बाबतीत इथली व्यवस्था गंभीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  करुणा मुंडे यांच्या बाबतीत दबावाचं राजकारण केले जात असल्याचे दिसत असून आवश्यकता पडल्यास वंचित बहुजन आघाडी करूणा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिणीताई टेकाळे आदी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=XfEuFGwADfA&t=1s

Previous Post
आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Next Post
शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी - रामदास आठवले

शेतकऱ्यांना भडकवणाऱ्या राकेश टिकेत सारख्या नेत्यांवर कारवाई करावी – रामदास आठवले

Related Posts
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

Eknath Shinde: गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय…
Read More

Rajesh Kshirsagar – अमृत २.० अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस रु.१५२ कोटींचा निधी मंजूर

Rajesh Kshirsagar : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना…
Read More