Rupali Chakankar | महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयाने तक्रारदार करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा १.२५ लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या मुलीला अंतरिम पोटगी म्हणून ७५,००० रुपये देण्याचे निर्देश दिले. यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
महिला आयोगाकडे तक्रार केली का, या प्रश्नावर करुणा शर्मा म्हणाल्या, ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या फक्त नेत्यांसाठीच काम करतात. त्यांच्याकडे तक्रार करून काही उपयोग नाही. मी राष्ट्रीय महिला आयोगाला निवेदन दिले असून, चाकणकरांना हटवण्याची मागणी केली आहे. कारण त्या धनंजय मुंडेंची बाजू घेतात. त्यांच्या सोबतचे फोटोही उपलब्ध आहेत.’
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवाजी महाराजांवर टिप्पणी करणाऱ्या राहुल सोलापूरकरांना गोळ्या झाडा, उदयनराजे संतापले
दिल्लीच्या विधानसभेचा कौल कुणाच्या बाजूने लागणार? एक्झिट पोलचे आकडे समोर आले
“कराडचा मुलगा कोट्यवधींच्या गाडीत फिरतो, पण मुंडेंच्या मुलाकडे…”, करुणा मुंडेंचे मोठे विधान