कसबा मतमोजणी : पहिल्या फेरीत अभिजित बिचुकलेंना ४ मतं

Pune – पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीची आज कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होत आहे. कसबा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क मधील धान्य गोदामात तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकरराव गावडे कामगार भवनात होत आहे. दोन्ही मतदार संघात झालेलं मतदान लक्षात घेता कसबा मतदार संघात मतमोजणीच्या 20 फेऱ्या तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होण्याची शक्यता आहे.

कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात लढत होत असून चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून पोस्टल मतांमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. यातच पहिल्या फेरीत अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत.