कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर, भाजपची चिंता वाढली 

Pune – अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातीलकसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती.

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कसब्यात कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होत आहे.

दरम्यान, कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.

कसबा पेठेतील भाजपचं वर्चस्व असलेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेत जनतेचे भाजपला डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भागातही धंगेकरांनाच जास्त मतं मिळाली आहे. हेमंत रासने यांनी या सगळ्या परिसरात कायम काम केलं आहे. तिथल्या मतदारांचा त्यांना पाठिंबा असतो. मात्र त्याच भागात जनतेने भाजपला पाठिंबा न दिल्याचं दिसत आहे.