मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा; आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

पुणे : मार्केट यार्डातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.परिसरातील वाढते अतिक्रमण, वाहनतळ व्यवस्था, शिवनेरी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी याबाबत देखील मिसाळ यांनी सूचना केल्या.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथील मुख्य बाजार आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मिसाळ मार्गदर्शन  करताना त्यांनी हे मुद्दे मांडले.

बाजार समितीचे प्रशासक मधुकर गरड, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप, उपायुक्त अविनाश सपकाळ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अरुण हजारे, सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने, विभागीय अतिक्रमण निरीक्षक डी. आर लंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.