कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योध्याना नोकरीत कायम करा – भारतीय मजदूर संघ

पुणे – कोरोना, लाॅकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा समाजाची गरज, आवश्यकता म्हणून चालू होत्या. या कालावधीत आरोग्य विभागाने अत्यंत महत्त्वाचे योगदान देवुन कोव्हीड महामारी मध्ये औषध उपचार, कोव्हीड सेंटर, मनपा, जिल्हा परिषद दवाखाने, आरोग्य केंद्रात डाॅटर, नर्स, लॅबोरेटरीमध्ये, लसीकरण केंद्र, चतुर्थ श्रेणी कामगार, सुरक्षा रक्षक ई यांनी कोव्हीड मारामारी वर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटा ऊचलला आहे. या कामगारांना मनपा मध्ये कायम नोकरीत समाविष्ट करण्यासाठी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने कामगारांचे लक्षवेधी आंदोलन मा अप्पर कामगार आयुक्त पुणे वाकडेवाडी येथे करण्यात आले.

या वेळी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व आरोग्य मिशन संघांचे अध्यक्ष दिपक कुलकर्णी शासनाने प्रशासनाने कोरोना योध्याना कायम नोकरीत समाविष्ट करण्यासाठी शासकीय, प्रशासन पातळीवर वारंवार पाठपुरावा केला आहे पण शासनाने अद्याप पर्यंत या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही यामुळे कोरोना योध्यायानी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने दि २१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे भव्य मोर्चा चे आयोजन केले आहे या मोर्चा मध्ये सहभागी होवून कामगारांच्या न्याय,हक्कांच्या मागण्या करिता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

महत्वपूर्ण मागण्या –
मनपा मुख्य सभा ठराव प्रमाणे सेवेत समावेश करा. नोकरी काळातील प्रलंबित बोनस फरक द्या.संघटनेने या बाबतीत मा कामगार उपायुक्त पुणे यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या आहेत या सुनावणी मध्ये लेबर आॅफीस पुणे येथे सुनावणीसाठी पुणे महापालिकेचे जबाबदार आधिकारी हेतुपुरस्सर कोणीही येत नाही.टाळाटाळ करत असल्यानेच कामगारांच्या मनात रोष निर्माण झाला असून हजारोच्या संख्येने मुंबई मोर्चा मध्ये सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या बाबतीत संघटनेने महाराष्ट्र राज्य मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कामगार मंत्री, आरोग्य मंत्री यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघ यांनी मागणी पत्र व्दारे कळविले आहे. गेट मीटिंग मध्ये अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस  सचिन मेंगाळे कामगार संघ. संघटनेचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघ.यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कोरोना योद्धा कामगार प्रतिनिधी सौ जयश्री रगडे, नुरानी शेख, उज्वला वाबळे, वर्षा मोरे, रोहित केंडे व मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. सर्व कामगार यांनी २१डिसेंबर मुंबई येथील मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत.