कालपर्यंत जे ‘बाप चोरला’ म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारत आहेत – उपाध्ये

Mumbai – निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena-Uddhav Balasaheb Thackeray) , असं नाव, तसंच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना(Shiv Sena of Balasaheb) हे नाव मिळालं आहे. मात्र, निवडणूक चिन्हासाठी त्यांनी दिलेले तिन्ही पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळले असून, त्यांना नव्यानं तीन पर्याय द्यायला सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाकडून शिंदे गटाला लक्ष्य केले जात आहे. यावरून शिंदे गटाची बाजू घेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP chief spokesperson Keshav Upadhye) यांनी ठाकरे गटावर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले आहे. कालपर्यंत जे ‘बाप चोरला’ म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारत आहेत. अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे, हे निवडणूक आयोगानेही मान्य केल्यावर, ‘हे बाळासाहेब आमचे नाहीत’ असे रडगाणे त्यांनी सुरू केले आहेत! याला ‘बाप नाकारणे’ म्हणतात.असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला झापलं आहे.