‘आमचे देवही दारू पितात, कालीमातेला दारूचा नैवेद्य…’, अभिनेत्री केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सातत्याने सोशल मीडियावर काही-ना-काही पोस्ट शेअर करत असते. बऱ्याचदा तिच्या पोस्टमुळे तिला टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलची हवाही खावी लागली होती. यानंतर पुन्हा एकदा केतकी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

केतकीने नववर्षाच्या (Ketaki Chitale Viral Post) निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या हातात दारूचा ग्लास दिसत आहे. ग्लास हातात घेऊन केतकी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं म्हटलंय, ‘फादर त्या सगळ्यांना माफकरा. कारण त्यांना माहिती नाहीये ते काय करत आहेत. ती काही चुकीचं बोलत असेन तर मला नक्की सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकीन इसका मतलब यह नहीं की बाकी सब 100%गलत है. सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका’.

केतकीचा दारू (Alcohol) पितानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. केतकीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. एका युझरनं म्हटलं, ‘वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं’.

या युझरला उत्तर देत केतकीनं वादग्रस्त्र विधान केलं आहे. तिनं म्हटलंय,  ‘मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसंच काही शंकाराच्या मंदिरातही. स्वत:ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका’. अभिनेत्री केतकीचा व्हिडीओ आणि युझरच्या कमेंटला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे.