केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media)  चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान,  केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.