मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ ​​सुफी बाबा यांची नाशिकमध्ये गोळ्या घालून हत्या

नाशिक – मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती (Khwaja Syed Chishti) उर्फ ​​सुफी बाबा यांची नाशिकमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात ही घटना घडली. येथे मंगळवारी 4 अज्ञात लोकांनी 35 वर्षीय मुस्लिम धर्मगुरूवर गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम गुरु अफगाणिस्तानचा होता. मात्र, त्यांच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मुंबईपासून 200 किमी अंतरावर असलेल्या येवला शहरातील आहे. येथील एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या जागेत ही घटना घडली. मयत मुस्लिम धर्मगुरूची येवल्यात सुफी बाबा म्हणून ओळख होती. हत्या केल्यानंतर मारेकरी सुफी बाबाची एसयूव्ही घेऊन घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.