किआचा धमाका : नोव्हेंबरमध्ये विकल्या ‘इतक्या’ कार !

नवी दिल्ली : किआ (Kia) इंडियाने नोव्हेंबर 2021 चे मासिक विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीने एकूण 14,214 कार विकल्या आहेत. ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत ही लक्षणीय घट आहे. महिन्या-दर-महिना विक्रीत सुमारे 13 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, तर वर्ष-दर-वर्षातील घसरण आणखी मोठी आहे कारण नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत विक्रीतही 32.3 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

Kia Sonnet च्या विक्रीत देखील लक्षणीय घट झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या 11,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केल्यापासून, कंपनीने गेल्या महिन्यात केवळ 4719 युनिट्सची विक्री केली आहे. खरं तर, ऑक्टोबर 2021 च्या तुलनेत Sonnetच्या विक्रीतही घट दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक विकली जाणारी Kia कार ही 8859 युनिट्स असलेली सेल्टोस कॉम्पॅक्ट एसयूव्ही होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये कार्निव्हलच्या ६३६ युनिट्सची विक्री झाली.

कंपनी आता लवकरच Carens MPV लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि ही कार कंपनीच्या विक्रीला चालना देईल. Kia Carens ही एक कौटुंबिक कार असेल आणि जेव्हा ती विक्रीसाठी जाईल तेव्हा या कारचे मॉडेल सहा आणि सात सीटर पर्यायांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पॅनोरामिक सनरूफ सारखी वैशिष्ट्ये देखील असणार आहेत. Carens मध्ये Seltosचेच इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. कारची किंमत 16-23 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

हे देखील पहा