युक्रेनमधील अनके महापौरांचे अपहरण; आतापर्यंत ५६४ अब्ज डॉलरचे नुकसान

कीव – युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या ३३ दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील अनके शहराच्या महापौरांचे अपहरण करत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. काही आम्हाला सापडत नाहीत, काही आम्हाला सापडले पण ते जिवंत नाहीत. द इकॉनॉमिस्टला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा दावा केला आहे.

दुसरीकडे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे, याचा आकडा समोर आला आहे. रशियाच्या पूर्णवेळ युद्धामुळे युक्रेनचे आतापर्यंत ५६४.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे, असे अर्थमंत्री युलिया सिव्ह्रिडेन्को यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की युक्रेनला पायाभूत सुविधांमध्येच 119 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. GDP मध्ये US$ 112 बिलियनचे नुकसान झाल्याचाही अंदाज आहे.

लहान मुलांनाही युद्धाचा फटका सहन करावा लागतो. युक्रेनच्या लोकपालानुसार, युक्रेन आणि रशियामध्ये पूर्णवेळ युद्ध सुरू झाल्यापासून 143 मुले मारली गेली आहेत आणि 216 जखमी झाले आहेत. त्यांच्या मते, वास्तविक आकडा यापेक्षा जास्त असू शकतो कारण तीव्र लढाईमुळे युक्रेनियन अधिकारी अनेक शहरांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.