किंगमेकर देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात आगमन; ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी केले स्वागत 

नागपूर : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली.   एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय.

दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोचलेत. नागपूर मध्ये प्रचंड जल्लोष आहे. उपमुख्यमंत्र्यांची (Deputy Chief Minister) मिरवणूक सुद्धा काढली असून. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.