किरीट सोमय्या यांचा धडाका सुरूच; २७ तारखेला ‘या’ जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार

लातूर : राज्यातील महा विकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गेल्या काही दिवसापासून विविध आरोपाची राळ उठवणारे भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे दि २७ ऑक्टोबर २०२१ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी दिली.

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या अनेक मंत्र्याची आणि नेत्यांची विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून कार्यवाही करण्यास भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी भाग पाडले. दिनांक २७ ऑक्टोबर 2021 बुधवार रोजी लातूर दौऱ्यावर किरीट सोमय्या येत आहेत. या दौऱ्यात लातूर जिल्ह्यातील बँका, साखर कारखाने आणि इतर उद्योगाबाबत भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चाही करणार आहेत अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

विविध बँका, साखर कारखाने, मनी लँडिंग व इतर विविध उद्योग धंदे याबाबतच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यावर आणि नेत्यावर भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप करून त्यांच्याविरुद्ध प्रशासनाला कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे.

येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री मंत्रीमंडळा बाहेर जातील तर अर्धे मंत्री रुग्णालयात पोहोचतील असे परवाच नुकतेच किरीट सोमय्या यांनी बोलून दाखविले आहे लातूर दौऱ्यात बँका साखर कारखाने व इतर उद्योग यातून किरीट सोमय्या कोणती माहिती संकलित करणार आहेत आणि कोणाविरुद्ध पुरावे गोळा करून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार हे त्याच दिवशी कळून येईल.

हे ही पहा: