येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड

येवला :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली येवला बाजार समिती शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या बाजार समितीच्या सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छगन भुजबळ यांनी संधी दिली.

आज येवला बाजार समितीत सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, संभाजी पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, विश्वास बापू आहेर,दिलीप खैरे, वसंत पवार, साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, दिपक लोणारी, प्रकाश वाघ, बाळासाहेब पुंड, नवनाथ काळे, मधुकर साळवे, ॲड.मंगेश जाधव यांच्यासह संचालक उपस्थित होते.

बाजार समिती निवडणुकीत दिलीप खैरे यांनी बजावली यशस्वी जबाबदारी

येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या संपूर्ण जबाबदारी छगन भुजबळ यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू दिलीप खैरे यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी दिली. या बाजार समिती निवडणुकीत प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली आणि निवडणूकीत यशही मिळाले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सभापतीपदी किसनराव धनगे तर उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड यांचा सत्कार

येवला बाजार समितीच्या सभापती पदी किसनराव धनगे व उपसभापतीपदी बापूसाहेब गायकवाड यांची निवड झाली. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील भुजबळ फार्म कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधत शेतकरी हितासाठी एकोप्याने काम करावे असे सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संभाजी पवार, दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्रशेठ काले, जगन्नाथ जगताप, मकरंद सोनवणे,अल्केष कासलीवाल, योगेश जहागीरदार, नंदकिशोर अट्टल,रामदास काळे,अरुण काळे, कांतीलाल साळवे, मनोज रंधे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.