Kishore Jorgewar | चंद्रपूर जिल्हात अनेक धोकादायक आणि अवैद्य होर्डिंग्ज आहेत. यामुळे आता धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात सदर होर्डिंग्जवर कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे. सदर निवेदनही आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पाठविण्यात आले आहेे.
चंद्रपूर जिल्हातील अनेक ठिकाणी धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज अस्तित्वात आहे. हे होर्डिंग्ज नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, काही दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळवारे सुरु असून येत्या काही दिवसात मान्सून हंगा-मात वादळवार्यामुळे त्या कधीही खाली पडू शकतात आणि गंभीर दुखापत किंवा जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतात.
याव्यतिरिक्त, ते शहराचं विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत आहे. मागील काही दिवसापूर्वी मुंबई मनपा भागातील घाटकोपर येथे धोकादायक होर्डिंग कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे सुद्धा सदर घटनेची पुनरावृत्ती होण्यापासून टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शासनच्या परवानगी न घेता व स्ट्रक्चरल ऑडिट न करता मनमानी प्रकाराने शहरात अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेल्या आहे, आणि त्यापण नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हातील सर्व होर्डिंग्ज चे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग व अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटविण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप