शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे माजी प्रवक्ते किशोर तिवारी ( Kishor Tiwari) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, ते पक्षाची नव्हे, तर स्वतःची मते मांडतात, त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होत आहे, असा आरोप केला. किशोर तिवारी यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटले की, ते पक्षाची अधिकृत भूमिका न मांडता स्वतःचे विचार मांडतात, त्यामुळे शिवसेनेची विश्वासार्हता कमी झाली आहे.
त्यांनी सांगितले की, संजय राऊत स्वबळाची भाषा करत असताना पक्षातील नेत्यांची गळती सुरू आहे. आदित्य ठाकरेंचे विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी आणि राजन साळवी यांनी पक्ष सोडला. तरीही “ज्याला जायचे आहे तो जाऊ शकतो” ही आत्मघातकी भूमिका पक्षाने घेतली आहे.
तिवारी ( Kishor Tiwari) यांनी सांगितले की, संजय राऊतांमुळे पक्षाची पत कमी झाली असून, पक्षाचा कोणताही ठोस आर्थिक कार्यक्रम किंवा दिशा नाही. तसेच, शिवसेनेचा हिंदुत्व अजेंडा मागे पडला असून, पक्षातील नेते काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यांवर गप्प आहेत.किशोर तिवारी यांची काही दिवसांपूर्वी प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण