“माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला”; सासूबाईंच्या निधनाचं खापर पेडणेकरांनी सोमय्यांवर फोडलं

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजया पेडणेकर यांनी काल 30 ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला.

किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या SRA घोटाळ्याच्या आरोपानंतर चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांनी केला आहे.

यानंतर आता पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनाचं खापर किरीट सोमय्यांवर फो़डलं आहे. “माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला” असा गंभीर आरोप केला आहे. तसेच सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे सासूबाईंनी धसका घेतल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

माझा कुटुंबातील एक बळी घेतला. तरीही मी 1 नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.दरम्यान,  गोमाता नगर (Gomata Nagar)एसआरए प्रकल्पातील गाळ्यांबाबत किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर सहा गाळे हडपल्याचे आरोप केले आहेत.  .