चुम्मेश्वरी..! दूर असतानाही किस करण्याचा जबरदस्त जुगाड, ‘Kiss Device’ शी संबंधित सर्वकाही माहिती

चीनमधील नवीन उपकरणांचा वारंवार उल्लेख केला जातो. वास्तविक, चीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार होत असतात. त्यातील काही आविष्कार विचित्र असतात, ज्यामुळे ते चर्चेचा विषय बनतात. असाच एक आविष्कार सध्या चर्चेत आहे, ज्याचे नाव किस डिवाइस (Kiss Device) आहे. या उपकरणाविषयी असा दावा केला जात आहे की या उपकरणाद्वारे दोन व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी असताना चुंबन घेऊ शकतात. एकमेकांना स्पर्श न करताही या उपकरणात किस करता येणार असल्याचा दावा केला जात आहे.

तुम्ही देखील विचार करत असाल की हे कसे शक्य आहे आणि हे उपकरण कसे कार्य करते?, ज्यामुळे असे म्हटले जात आहे की एकमेकांना स्पर्श न करता चुंबन केले जाऊ शकते. तर जाणून घ्या या उपकरणाशी संबंधित काही खास गोष्टी…

या उपकरणाची कथा काय आहे?
माध्यमातील वृत्तानुसार, पूर्व चीनच्या जिआंगसू प्रांतातील एका विद्यापीठाने या चुंबन उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणाबाबत असे सांगितले जात आहे की, दूर बसलेल्या व्यक्तीसोबत चुंबन घेता येते आणि त्याचा अनुभव खऱ्या चुंबनासारखाच आहे. जियांग झोंगली नावाच्या व्यक्तीला लाँग डिसटन्स रिलेशनशीपमुळे जवळीक साधणे कठीण जात असे. दूर असल्यामुळे तो त्याच्या पार्टनरशी फक्त फोनवरच बोलत असे. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने या उपकरणाचा शोध लावला, ज्यामुळे त्याची उपस्थिती जाणवू शकते. असा दावा केला जात आहे की, जेव्हा किस डिवाइसमधून चुंबन केले जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीला खूप जवळून चुंबन केल्यासारखे वाटते.

हे उपकरण कसे कार्य करते?
या उपकरणाचा शोध चीनमध्ये लागला असून ते सेन्सरच्या आधारे काम करते. याला काही सेन्सर्स जोडलेले आहेत, जे एकमेकांना वास्तवासारखा अनुभव देतात. वास्तविक, जिआंगसू प्रांतातील एका विद्यापीठात यावर काम करण्यात आले होते आणि त्याचा आकार चेहऱ्यासारखा आहे. हे उपकरण ब्लूटूथ आणि अॅपला जोडलेले आहे आणि त्यात बनवलेल्या ओठांवर दोन लोक चुंबन घेतात. मग जोडीदाराची जी प्रतिक्रिया असते, त्यानुसार दुसऱ्या जोडीदाराला अनुभव येतो. अगदी तापमान वगैरेही तसंच जाणवतं.

परिणामी आता लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना जोडीदाराला न भेटता किस करण्याचा अनुभव मिळणार आहे. सोशल मीडियावर या उपकरणाची खूप चर्चा होत असून या उपकरणाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यासोबत व्हिडिओत चुंबन कसे घ्यावे आणि प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यावा हे दाखवण्यात आले आहे.