कोलकत्याने मुंबईची दुनिया टाकली हालवून, मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव

नवी दिल्ली : आयपीएल 2021 फेज -2 मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना रंगला होता. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईने 155 धावा केल्या. केकेआरला 156 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 16 व्या षटकात फक्त 3 गडी गमावून सहज पूर्ण केले.

केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याने आपल्या डावात चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. अय्यरने आपले पहिले आयपीएल अर्धशतक केवळ 25 चेंडूत पूर्ण केले होते. अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. या जोडीला बघून असे वाटले की मुंबई सहजपणे 200 पेक्षा जास्त स्कोअर करू शकेल, पण संपूर्ण टीम फक्त 155 चा स्कोअर सांभाळू शकली. पहिल्या विकेटनंतर संघाने शेवटच्या पाच विकेट 77 धावांत गमावल्या.