खराब फॉर्मशी झगडत असलेल्या केएल राहुलने ‘महाकाल’पुढे टेकवला माथा, पत्नी अथियाही दिसली सोबत

उज्जैन| खराब फॉर्मशी झुंजत असलेला भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी (Athiya Shetty) लग्नानंतर पहिल्यांदाच महाकालच्या दर्शनासाठी गेले आहेत. भारतीय क्रिकेट संघ इंदौरमध्ये 1 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी फलंदाज केएल राहुलने पत्नी अथिया शेट्टीसह उज्जैन येथील राजाधिराज महाकालेश्वरच्या दरबारात (KL Rahul Visited Mahakal Temple) नतमस्तक झाले. दोघे भस्म आरतीला देखील उपस्थित होते.

राहुल आणि अथिया दोघांनी अवंतिकानाथ यांचे आशीर्वाद घेतले. इंदोरपासून अवघ्या 55 ​​किलोमीटर अंतरावर असलेल्या उज्जैनमध्ये टीम इंडियाचे इतर क्रिकेटपटूही डोके टेकवण्यासाठी पोहोचू शकतात.

खराब फॉर्ममधून जात असलेल्या राहुलसाठी इंदोरची कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ही त्याची शेवटची संधी असू शकते, असे मानले जाते, त्यामुळे बाबा महाकालने त्याला आशीर्वाद दिल्यास तो या कठीण परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होईल!