Net Worth: उगाच सुनिल शेट्टीने केएल राहुलला बनवलं नाहीये जावई! वर्षाकाठी अथियापेक्षा कमावतो तिप्पट पैसा

बहुचर्चित सेलिब्रीटी कपल अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे अखेर शुभमंगल सावधान झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले (KL Rahul Athiya Shetty Wedding) आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.

अथिया आणि राहुलचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का, अथिया आणि राहुलची एकूण संपत्ती किती आहे? नसेल तर त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया..

केएल राहुल कोट्यवधींचा मालक (KL Rahul Net Worth)
क्रिकेटर केएल राहुलचे नाव आज सर्वांनाच माहित आहे, त्याने आपल्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियामध्ये स्थान निर्माण केले आहे. याशिवाय तो आयपीएलमध्येही आपला जलवा दाखवताना दिसत आहे. केएल राहुलचा बीसीसीआयच्या ए ग्रेड कराराच्या यादीत समावेश आहे, ज्यासाठी त्याला वर्षाकाठी 5 कोटी रुपये मिळतात. त्याच वेळी, गेल्या वर्षी आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सने 17 कोटींची मोठी रक्कम देऊन त्याला संघात सामील केले होते. याशिवाय त्याने पुमा, बोट, रेडबुल आणि आरबीआय सारख्या अनेक मोठ्या ब्रँडची जाहिरात केली आहे. त्यानुसार त्याची एकूण संपत्ती 80 कोटींच्या आसपास आहे.

अथिया शेट्टीची संपत्ती (Athiya Shetty Net Worth)
सुनील शेट्टीची मुलगी बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे फिल्मी करिअर अजून उंचीवर पोहोचलेले नाही. तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘हीरो’ या चित्रपटापासून झाली जो फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने मोतीचूर चकनाचूर, मुबारकां सारखे चित्रपट केले, पण तेही छाप सोडू शकले नाहीत. पण असे असूनही अथिया शेट्टी मोठी कमाई करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेते. याशिवाय, ती अनेक ब्रँड एंडोर्समेंटला प्रोत्साहन देते, ज्यासाठी तिची फी 40 ते 50 लाखांपर्यंत आहे. तिची एकूण संपत्ती 28 ते 29 कोटी इतकी आहे.