भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने ( KL Rahul) त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्यासोबत मिळून ७ एकर जमीन खरेदी केली आहे. पश्चिम ठाण्यातील ओवळे परिसरात त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे. भारतातील मालमत्तेचा डेटा ठेवणारी कंपनी ‘स्क्वेअर यार्ड्स’ नुसार, ही मालमत्ता राहुल आणि सुनील शेट्टी यांनी मार्च २०२५ मध्ये खरेदी केली होती, ज्यासाठी त्यांनी ९.८५ कोटी रुपये दिले होते. यासाठी त्यांना ६८.९६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणीसाठी ३० हजार रुपये भरावे लागले.
पश्चिम ठाण्यातील ओवळे परिसर घोडबंदर रोडजवळ आहे. मुंबई, ठाणे आणि पश्चिम भागातील शहरांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे क्षेत्र खूप महत्वाचे मानले जाते. राहुल ( KL Rahul) आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी गेल्या वर्षी वांद्रे येथील पाली हिल येथील संधू पॅलेसमध्ये ३,३५० चौरस फूट आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते, ज्याची किंमत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात होते. राहुलच्या कुटुंबाला त्या अपार्टमेंटमध्ये चार पार्किंग स्लॉट मिळाले. या आलिशान अपार्टमेंटच्या खरेदीवर राहुल-अथियाला १.२० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली.
काही आठवड्यांपूर्वीच केएल राहुलच्या घरी एका लहान पाहुण्याचा जन्म झाला. २४ मार्च २०२५ रोजी राहुलला मुलीचा बाप होण्याचे भाग्य लाभले, त्यामुळे तो आयपीएल २०२५ च्या पहिल्या काही सामन्यांना मुकला.
केएल राहुल आयपीएल २०२५ मध्ये धुमाकूळ घालत आहे.
आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना केएल राहुलने फक्त ४ डावात २०० धावा केल्या आहेत. राहुल या हंगामात १६४ च्या तुफानी स्ट्राईक रेटने खेळत आहे आणि त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार डावांमध्ये २ अर्धशतके केली आहेत. राहुल हा चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?