KL राहुलच्या टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी, जगाच्या नजरा या विश्वविक्रमावर खिळल्या 

नवी दिल्ली- भारतीय संघ 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 19 जूनपर्यंत खेळवली जाणार असून मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानावर होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विश्वविक्रम करण्याची संधी आहे. 2021 च्या T20 विश्वचषकापासून भारतीय संघाने सलग 12 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. आता भारताच्या नजरा 13 वा सामना जिंकून विश्वविक्रम करण्यावर आहेत.

भारतीय संघ सध्या अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या बरोबरीने उभा आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत भारतीय संघाला तिरंगा फडकवून विश्वविक्रम करण्याची संधी आहे. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकला तर सलग 13 T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा तो जगातील पहिला संघ बनेल. त्यामुळे भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा या विक्रमाकडे लागल्या आहेत.

या विजयाचा प्रवास कुठून सुरू झाला?

2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानसोबतचा पहिला सामना आणि न्यूझीलंडसोबतचा दुसरा सामना हरला. या दोन पराभवांमुळे संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही, पण त्यानंतर संघाने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले. यानंतर भारताने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत.

या मालिकेसाठी दोन्ही संघांच्या संघांवर एक नजर

भारत : केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्केआ, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, ट्रायसन स्टब्स, रासी व्हॅन डर ड्यूसेन, मार्को यान्सेन.