जाणून घ्या ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला ? मर्सिडीज जळून राख झाली

नवी दिल्ली –  भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला (Rishabh Pant’s accident) . हा अपघात इतका भीषण होता की दुभाजकाला धडकल्याने क्रिकेटपटूची मर्सिडीज कार पूर्णपणे जळून खाक झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.(Know how exactly Rishabh Pant’s accident happened? The Mercedes burned to ashes)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी ऋषभ पंतची मर्सिडीज कार आज पहाटे 5.15 वाजता नरसन सीमेवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने वाटसरूंनी विंड स्क्रीन तोडून पंतला गाडीतून बाहेर काढले. त्यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे कार चालवत असताना त्याला झोप लागली आणि काही सेकंदातच कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली आणि अपघात झाला.

जखमी क्रिकेटपटूला त्वरीत रुरकीच्या सक्षम रुग्णालयात नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, क्रिकेटरच्या शरीरात फारशी जखम नाही, पण एका पायाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघातात जखमी क्रिकेटपटू ऋषभ पंतची माहिती अधिकार्‍यांकडून घेतली आहे. यासोबतच त्यांच्या उपचारासाठी शक्य ती सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.