पती आणि पत्नीच्या वयात किती अंतर असावे? Happy Married Life जगायची असल्यास ही बातमी वाचाच!

‘वय हा फक्त एक आकडा आहे’ असं म्हटलं जातं. ही गोष्ट स्व-प्रेरणेसाठी ठीक आहे, पण नातेसंबंधांचा विचार केला तर त्याचा अर्थ केवळ संख्येपुरता मर्यादित नाही. जसजसे तुम्ही मोठे होत जाल तसतसे तुमची मॅच्युरिटी लेव्हल आणि अनुभवही वाढतो. अशा स्थितीत प्रत्येक वयोगटात समरस होणे सोपे नाही. विशेषत: जोडप्यांच्या वयात फारसा फरक नसावा, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होण्याची (Relationship Tips) शक्यता वाढते. असे आम्ही नाही, विज्ञान म्हणते.

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्या नातेसंबंधांमध्ये पत्नीचे वय मोठे आहे, त्या नातेसंबंधांमध्ये अधिक समस्या येतात. हेच कारण आहे की पूर्वीच्या काळी मुलीपेक्षा वयाने मोठा मुलगा लग्नासाठी पाहिला जात असे आणि आताही अधिकांश जोडप्यात मुलगाच वयाने मोठा असल्याचे दिसते. चला जाणून घेऊया पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा (Age Gap In Couples) आणि मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असणे का चांगले (Ideal Age Gap In Married Couple) मानले जाते?

वयाबद्दल स्टडी काय सांगतो?
अटलांटा येथील एमोरी युनिव्हर्सिटीमध्ये लग्नासाठी जोडप्यांच्या वयातील फरकाबाबत अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास 3,000 लोकांवर करण्यात आला. या अभ्यासात असे समोर आले आहे की, ज्या जोडप्यांमध्ये फक्त एक वर्षाचा फरक आहे, त्यांच्यात घटस्फोटाची शक्यता फक्त 3 टक्के आहे. पाच वर्षांच्या वयोगटातील अंतर असलेल्या जोडप्यांना विभक्त होण्याची शक्यता 18%, 10 वर्षांच्या वयातील अंतरासाठी 39% आणि 20 वर्षांच्या अंतरासाठी 95% असते. दुसरीकडे, मूल झाल्यानंतर घटस्फोटाची शक्यता 59 टक्क्यांनी कमी होते. म्हणजेच, अभ्यासानुसार, वयोगटातील अंतर जितके कमी होईल, तितका पती-पत्नीमधील समन्वय अधिक चांगला होईल आणि घटस्फोटाची व्याप्ती कमी होईल.

नवरा का मोठा असावा?, वैज्ञानिक तथ्ये समजून घ्या
सर्व अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मुलींचा मेंदू मुलांपेक्षा अधिक प्रौढ असतो, अर्थातच मुली मुलांपेक्षा जास्त मॅच्युअर असतात. अशा स्थितीत जर मुलाने समान वयाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलीशी लग्न केले; तर पत्नी मानसिकदृष्ट्या त्याच्यापेक्षा जास्त परिपक्व असेल. अशा परिस्थितीत दोघांमधील अहंकाराची समस्या पुन्हा पुन्हा समोर येईल. पतीने सांगितलेल्या सर्व गोष्टी तिला ऐकता येणार नाहीत आणि कमी प्रौढ असल्यामुळे पतीकडून तिच्याकडून अपेक्षित असलेला आदर ती देऊ शकणार नाही. त्यामुळे दोघांमधील भांडणे वाढणार हे उघड आहे.

याशिवाय, हार्मोनल बदलांमुळे मुलगी शारीरिकदृष्ट्या मुलापेक्षा लवकर वृद्ध दिसते. जर बायको लवकर म्हातारी दिसू लागली तर नवऱ्याचे बायकोबद्दलचे आकर्षण कमी होते. परिणामी दोघांमध्ये योग्य समन्वय बसू शकणार नाही.

आजही आपल्या समाजात कुटुंब चालवण्याची जबाबदारी पुरुषावर आहे. अशा परिस्थितीत समान वयाचे जोडपे असल्यावर आदराचा अभाव दिसून येतो. तसेच, पुरुषाला त्याच्या जबाबदारीचीही पूर्ण जाणीव नसते. म्हणूनच जर एखाद्या पुरुषाचे वय स्त्रीपेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये सामंजस्य चांगले असेल. एकमेकांबद्दल आदर, आकर्षण राहून नातं अधिक घट्ट होतं.