गरम पाण्याने अंघोळ केल्याने वडील बनण्याच्या आशेवर फिरेल पाणी! Warm Water Bathचे तोटे वाचाच

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा आपण आपल्या आरोग्याशी खेळतो. असेच प्रकरण गरम पाण्याने अंघोळीशी संबंधित आहे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. ते कसे, जाणून घेऊ या विशेष लेखातून.. (Bad Effects Of Warm Water Bath)

पुरुषत्वावर होतो परिणाम
बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुष त्यांच्या आरोग्याशी खूप तडजोड करत आहेत. आजच्या तरुणांमध्ये वंध्यत्व ही एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. एनसीबीआयच्या सर्वेक्षणानुसार, सध्या वंध्यत्वाच्या एकूण प्रकरणांपैकी 40-50 टक्के प्रकरणे हे पुरुषांच्या शुक्राणूंची खराब गुणवत्ता आहे. वडील होण्यासाठी शुक्राणूंची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. एका अभ्यासानुसार, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. ज्या लोकांना फर्टिलिटीशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यांनी गरम पाण्याने अंघोळ अजिबात करू नये.

त्वचा कोरडी पडते
गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील आर्द्रता निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये.

संसर्गाचा धोका
खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे शरीरात ऍलर्जी आणि संसर्गाचा धोका वाढतो.

शरीर सुस्त होते
गरम पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराला खूप आराम वाटतो. आंघोळीनंतर शरीर सुस्त होऊन झोप लागते. थंड पाण्याने अंघोळ केल्याने दिवसभर उत्साही वाटते.

चेहऱ्यावर सुरकुत्या येतात
वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नयेत असे वाटत असेल तर गरम पाण्याने अंघोळ अजिबात करू नका. गरम पाणी शरीरातील नैसर्गिक तेल नष्ट करते, त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात.

(नोट: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. आझाद मराठी याची पुष्टी करत नाही.)