हे माहिती करुनच घ्या! हॉटेलच्या खोलीतील छुपा कॅमेरा कसा शोधावा? ‘या’ टिप्स करतील मदत

हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्पाय कॅमेरा (Spy Camera) लपवणे ही नवीन गोष्ट नाही. अशा अनेक घटना समोर येत असतात, ज्यामध्ये खोल्यांमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे (Hidden Camera) लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स (Tips To Find Spy Camera In Hotel) सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही खोलीत छुपा कॅमेरा शोधू शकता.

हॉटेलमध्ये चेक इन करताच रूममध्ये प्रवेश केल्यावर संपूर्ण खोलीभोवती विचित्र गोष्टी शोधणे सुरू करा. जर काही ठिकाणाहून बाहेर दिसत असेल तर ते साधन काढून टाका. त्याचप्रमाणे, तुम्हाला कोणतेही विचित्र उपकरण दिसल्यास, हॉटेल कर्मचारी किंवा व्यवस्थापकाला कॉल करा. वास्तविक, हॉटेलमधील हिडन कॅमेऱ्याचा आकार खूपच लहान असतो, त्यामुळे तो कुठेही सहजपणे लपवला जाऊ शकतो.

बहुतेक कॅमेरा लेन्स प्रकाश प्रतिबिंबित करतात. त्यामुळे खोलीत लपवलेला कॅमेरा प्रकाश नक्कीच परावर्तित करेल हे लक्षात ठेवा. खोलीचे दिवे बंद करा आणि पूर्ण अंधार करा. मग मोबाईलच्या फ्लॅशलाइटने संपूर्ण खोलीत पहा. कुठेतरी प्रतिबिंब दिसले तर लगेच ते ठिकाण तपासा (How To Find Spy Camera). जर तुम्हाला खोलीत काही विचित्र वस्तू किंवा तिथे नको असलेल्या गोष्टी दिसल्या तर त्यांना ताबडतोब टॉवेलने झाकून टाका. कोणतेही विचित्र उपकरण दृश्यमान असल्यास, ते अनप्लग करा आणि ते झाकून टाका. तुम्ही व्यवस्थित खोलीची पाहणी केल्यास अशा गोष्टी शोधू शकता आणि त्या कपाटात लपवू शकता.

शिवाय आजकाल तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. असे अनेक अॅप्स (Spy Camera Detector Mobile Apps)) मोबाइलमध्ये डाउनलोड केले जाऊ शकतात, ज्याच्या मदतीने खोलीत छुपा कॅमेरा शोधता येतो. बाजारात अशी अनेक स्पाय कॅमेरा उपकरणे आहेत, ज्याच्या मदतीने खोलीत छुपे कॅमेरे शोधले जाऊ शकतात. तुम्ही हॉटेलमध्ये राहणार असाल तर हे उपकरण तुमच्यासोबत ठेवा.