वेस्ट इंडिज दौऱ्यातून कोहलीला वगळले, जसप्रीत बुमराह-युजवेंद्र चहल देखील T20 संघातून बाहेर 

Mumbai –  वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 (T-20) मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India)18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli)विश्रांती देण्यात आली आहे. तो टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोहलीशिवाय वनडेचा नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah)टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तसेच शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.
रविचंद्रन अश्विनचेही (Ravichandran Ashwin) संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, केएल राहुल आणि कुलदीपला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. निवड समितीने विराट कोहलीला टी-20 मालिकेतून विश्रांती देण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र समितीने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला विचारल्यानंतरच विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या दोन महिन्यांत कोहलीला विश्रांती देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली नव्हती.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ :रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात राहणे फिटनेसवर अवलंबून आहे